This poem is written by one of my uncle, long before, I was even born. How simple yet so true perception .... Just wanted to save it somewhere :)
वाहून वाहून थकलेल्या
नदीचा प्रवाह आटतो तेव्हा ....
हळू हळू का होईना
ती वाहतच जाते ;
इतकेच पाण्यावर तिच्या
..... हिरवेगार शेवाळ साचते.
-का- s s कुणास ठाऊक
तहान शमाविणाऱ्या जीवास
ते हेच सांगत असते ;
कि माझ्या जातायुश्यात
मी दुथडी तुंबून खळखळत ...
वाहत होते ........
........... आणि माणसाचे जीवन देखील
अगदी असेच वाहत असते
पण .... कधीतरी ओघ मंदावतो
..... आणि ... कसले तरी शेवाळ साचते .
ते दूर सारण्यासाठी खूप धडपडतो
पण त्यासाठी मागून मोठा s s ....
ओहोळ यावा लागतो
आणि .... तो .... अश्रूंचाच असतो ....
Job
13 years ago
No comments:
Post a Comment