पाउस
आज खूप दिवसानंतर पावसाला अस पहिल. ऑफिस च्या आठव्या मजल्या वर , विंग च्या बाहेर मीटिंग सुरु होण्याचीवाट पाहत होते मी , तेवढ्यात वीज चमकली आणि हळूच पाउस सुरु झला. आज वेगळीच मजा आली , त्या ऑफिसच्या काचेच्या भिंतीमधून , आज आकाशातून पाउस पडताना पहिला .आहा पडताना नाही वादळात झाडाची पाने आधीउडतात आणि खाली येतात न तशी पावसाची थेंब पहिली, जणू कोणी कापसाची छोटी छोटी फुल उडवत होत एरवीजशी पावसाची थेंब जमिनीवर किवा अंगावर येऊन आपटतात हि तशी नहोती … अलगद कोणी तरी छोट्यापारदर्शक पाण्याचे बुडबुडे फेकत होत अस वाटत होत. खरच , मी वेड्या सारखी किती वेळ भान हरपून बघत होते . किवा ते जत्रेत साबणाच्या पाण्यात तार बुडवून आणि ईवले ईवले फुगे उडवत तशेच अगदी तशेच हे थेंब येऊनअलगद त्या काचेच्या भिंतीवर बसत होते …. आणि मी फक्त आणि फक्त बघू शकत होते ........
No comments:
Post a Comment