स्वतहाला सांभाळायला सुरुवात केलीच होती,
तेवढ्यात मन चालायच थांबलं,
मी तर त्याला उठवत होते,
पण ते तर त्याच्याच स्वप्नांच्या दुनियेत होतं,
वेड आहे मन माझ.
मी अश्रूंचा नदीचे पाणी पीत होते,
आणि मन पावसाचा आनंद घेत होतं,
मी त्याला हळूच म्हटले उठ,
जागा हो हे स्वप्न नाही,
त्याला तर चिंताच नाही,
कारण , वेड आहे मन माझं.
जगाच्या खडकाळ वाटेवर,
मला दगडं टोचत असताना,
ह्याला तर फुलांची गादी वाटत होती,
त्याला तर फक्त उडता येतं,
कोणी काहीहि म्हटलं तरी,
ते झेपाचं घेतं,
वेड आहे मन माझं.
फुलपाखरू आहे मन माझं,
फक्त फुलांची वाट बघत,
भवरे कळत नाही त्याला,
अरे वेड्या हे जग एक सत्य आहे ,
पण ते तर त्याच्याच स्वप्नांच्या दुनियेत होतं,
वेड आहे मन माझ.
Job
13 years ago